सुधा मूर्ती यांच्या यशाचा प्रेरणादायी प्रवास,जन्म,शिक्षण, करिअर : Sudha Murthy Biography In Marathi 2025

आज Infosys Technologies Limited नाव संपूर्ण जगभरामद्धे प्रसिद्ध आहे.  N.R. Narayana Murthy हे कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. परंतु अशी एक म्हण आहे की “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो”, तसा Narayana Murthy ह्यांचा यशामागे त्यांची पत्नी सुधा मूर्ती आहेत. उद्योगपती, शिक्षक, लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या ह्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा सुधा मूर्ती ह्यांचे जीवन व त्यांची यशोगाथा जाणून घेऊया.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते जीने त्याला काहीतरी चांगले सुरू करण्यासाठी आपले हात भर असतात. सुधा मूर्ती यांनी त्यांचे पती नारायण मूर्ती यांना काही पैसे उधार देऊन इन्फोसिसला मदत केली.  1981 मध्ये 10,000. आणि आज तीच अब्जावधी डॉलरची कंपनी कोणाला माहीत नाही ?

ज्या काळा मध्ये ‘पुरुष-प्रधान करिअर’ मानलं जात होतं, त्या काळात सुधाने an electronics engineer होणं त्यांनी पसंत केलं होत. लवकरच, TELCO (टाटा मोटर्स) ने तिला पहिली-वहिली महिला अभियंता म्हणून नियुक्त केले आहे.

सुधा मूर्ती यांचा जन्म आणि परिवार

सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी झाला आहे. त्यांचं जन्मस्थळ कर्नाटक हावेरी येथील शिगगाव मधीला. त्या ब्राम्हण आणि सुशिक्षित कुटुंबातील असल्यामुळे साधेपणा आणि चांगल्या विचारांचे बीज त्याच्या मनात लहानपणा पासूनच पेरले गेले. त्यांचा वडिलांचे नावं डॉ. आर. एच. कुलकर्णी आणि आईचे नावं विमला कुलकर्णी आहे. सुधा मूर्ती व त्यांचा तिन्ही भावंडाना घडविण्यात त्यांचा आई वडील व आजी आजोबांचे योगदान खूप महत्वाचे आहे. आणी ही गोष्ट स्वतः मूर्ती त्यांची यशोगाथा सांगतात.

सुधा मूर्ती

Sudha Kulkarni-Murthy

Full NameSudha Murthy
Born19 August 1950 ( age 74 years)
Born In PlaceHaveri, Karnataka ( Shiggaon )
Father’s nameDr. R. H. Kulkarni
Mother’s nameVimala Kulkarni
EducationBE (Electrical and Electronics Engineering), ME (Computer Science)
Social workChairperson of Infosys Foundation, social worker
AwardVarious National Awards
Net Worth775 Crore
Narayan Murty Net Worth( Husband)36,690 Crore

सुधा मूर्ती यांचे शिक्षण

सुधा मूर्ती यांचा जन्म जरी कर्नाटक मध्ये झाला असला तरी त्यांच पूर्ण बालपण महाराष्ट्रामधील कुरुंदवाड येथे गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमिक शाळेतून झाले त्यामुळे त्या आतासुद्धा सुद्ध मराठी मध्ये बोलतात.

त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांच्या मुलींनी डॉक्टर व्हावं. आई शिक्षिका असल्यामुळे आईला असे वाटत होतं मुलींने प्रोफेसर व्हावं तर आजोबांना वाटत होतं नातीने इतिहासात पी एच डी करावी, मात्र सुधा मूर्तीनी इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला.

मूर्ती यांनी BVB College of Engineering and Technology मधून Electrical and Electronics Engineering मध्ये BENG डिग्री संपादन केली नंतर त्यांनी १९७४ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये MENG पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

सुधा मूर्ती यांचे करिअर

मूर्ती यांनी प्रसिद्ध असलेली पुण्यातील TELCO ह्या कंपनी मध्ये त्यांना विकास अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी मुंबई व जमशेदपूर इथे सुद्धा काही काळ काम केले.

त्या नणतेर त्यांना वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये आपल्या अनुभवाची झलक दाखवत त्या पद देण्यात आल. त्यातून मिळालेल्या अनुभवाचा फायदा घेत त्यांनी इन्फोसेस फॉउंडेशन चा मुख्य पाया रचला. मूर्ती ह्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

त्या एक समाजसेविका सुद्धा आहेत त्यांची मूर्तिज इन्फोसिस फॉउंडेशन हा धर्मादाय ट्रस्ट असून त्यांच्या माध्यमातून त्या  आशा अनेक समाज उपयोगी काम करत असतात.

सुधा मूर्ती यांनी लिहिलेली पुस्तके

  • आजीच्या पोतडीतील गोष्टी
  • आयुष्याचे धडे गिरवताना
  • गोष्टी माणसांच्ता
  • जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)
  • डॉलर बहू (इंग्रजी)-(मराठी)
  • परीघ (मराठी)
  • अस्तित्त्व
  • द ओल्ड मॅन अँड हिज गॉड (इंग्रजी)
  • परिधी (कानडी)
  • पितृऋण
  • तीन हजार टाके
  • पुण्यभूमी भारत
  • बकुळ (मराठी)
  • महाश्वेता (कानडी व इंग्रजी)
  • थैलीभर गोष्टी

सुधा मूर्ती यांना प्राप्त झालेले पुरस्कार

  • ११९५:- उत्तम शिक्षक पुरस्कार मिळाला.
  • 2004: – श्री राजा-लक्ष्मी फाउंडेशन तर्फे त्यांचा चेन्नईमधून राजा-लक्ष्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
  • 2006:-  भारताचा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार “पद्मश्री” देऊन त्याना गौरवण्यात आले.
  • 2006:-  आर.के. नारायणांचा साहित्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
  • 2010:-  कर्नाटक सरकारचा चिंतामणी अतिमब्बे पुरस्कार
  • 2011:- शिक्षण आणि शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर ऑफ लॉज (LL.D) पदवी बहाल करण्यात आली.
  • 2023:-  भारताच्या केंद्र सरकारकडून मानाचा पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले.
  • 2023:- $50,000 किमतीचा ग्लोबल इंडियन अवॉर्ड त्यांना मिळाला,त्याने ही रक्कम फील्ड इन्स्टिट्यूट (टोरंटो विद्यापीठ) ला दान स्वरूपात देऊ केली.

सुधा मूर्ती: वैयक्तिक जीवन

एन.आर. नारायण मूर्ती यांच्याशी पुण्यातील टेल्को येथे अभियंता असताना, त्यांची ओळख सुधा मूर्ती यांच्याशी झाली. नंतर मग त्यांनी पुढे लग्न केले. याना दोन मुले आहेत, अक्षता (मुलगी) आणि रोहन (मुलगा). अक्षताने ऋषी सुनकशी लग्न केले, जो तिचा स्टॅनफोर्डमधील वर्गमित्र आणि यूकेचा माजी अर्थमंत्री होते.

मूर्ती बोलतात “जहा स्त्रियों का सन्मान होता है वहा पर भगवान का निवास होता है.”

Conclusion

आशा प्रकारे सुधा मूर्ती यांचा जीवनाचा प्रवास कसा झाला हे आपण या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.

FAQ

सुधा मूर्ती यांचा पहिलं रोजगार ?

TELCO कंपनी, पुणे ( विकास अभियंता )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top