एकाच ऑलिम्पकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनली आहे. सर्व जगभरातून कौतुक होत आहे. वयाच्या अवघ्या 22 वर्षी तरुणीने इतिहास रचला आहे.
थोडक्यात…
- मनू भाकर ने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले
- 7 पदके आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कपमध्ये 21 पदके जिंकली आहेत.
- १६ व्या वर्षी, 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारि सर्वात तरुण भारतीय बनली.
- ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय देखील आहे.
तरी चॅम्पियन खेळाडूचा प्रवास काही सरल व सोपा राहिलेला नाही. मनु भाकर ने भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकले असून अशी कामगिरी करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक, जागतिक चॅम्पियनशिप, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि युवा ऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्ण पदकांसह, मनू भाकर फार कमी वयात इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय महिला नेमबाज बनली आहे.
मनु भाकर यांचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 झाला. मनु भाकर ही एक भारतीय क्रीडा नेमबाज आहे.
मनु भाकर ने ऑलिम्पिक खेळांमध्ये 2 पदके तसेच आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 7 पदके आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कपमध्ये 21 पदके जिंकली आहेत.
ऑलिम्पिकमध्ये तिच्या चांगल्या कामा बद्दल तिला प्रमुखाने ओळख मिळाली, मनु भाकर 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली भारतीय महिला नेमबाज बनली. तिने 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत आणखी एक कांस्य जिंकले, मनु भाकर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय तरुणी ठरली.
मनु भाकर ने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत. 2022 आशियाई स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने महिलांच्या 10-मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, जिथे तिने नवीन राष्ट्रकुल खेळांचा विक्रम रचला. भाकर या वयाच्या १६ व्या वर्षी, 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारि सर्वात तरुण भारतीय बनली.
2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलमध्ये अडचण आल्यामुळे भाकर साठी तो दिवस कठीण गेला. तिला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा आणि भगवद्गीतेतून प्रेरणा मिळाली.
Manu Bhaker
Full Name | Manu Bhaker |
Born | 18 February 2002 ( age 22 ) |
Born of Place | Goria Village, Jhajjar District, Haryana |
Education | Lady Shri Ram Collage DAV Collage |
Father’s Name | Ram Kishan Bhaker |
Occupation | Shooting |
Famous For | 1st Indian Female Shooter to Earn a Medal In The Olympics |
शिक्षण
मनु भाकरचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 मध्ये हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील जाट कुटुंबात झाला आहे. मनुचे वडील राम किशन मर्चंट नेव्हीमध्ये आहेत, तर आई सुमेधा भाकर शाळेमध्ये मुख्याध्यपिका पदावर आहेत. मनुने डॉक्टर बनावं अशी तिच्या आईची इच्छा होती. तिच्या शालेय शिक्षणादरम्यान, तिने टेनिस, स्केटिंग, मणिपुरी मार्शल-आर्ट आणि बॉक्सिंग यांसारख्या विविध खेळांमध्ये भाग घेतला, मात्र शाळेतील पीटी टीचरने त्यांना सांगितलं की मुनला स्पोर्ट्समझध्ये टाका. डॉक्टरांना फक्त गाव आणि जवळेच लोक ओळखतात पण एखाद्या खेळाडूला संपूर्ण देश 14 वर्षांची असताना तिने नेमबाजीच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
मनु भाकर हिच्या खेळातील प्रवास लहान वयातच सुरू झाला. सुरुवातीला, ती बॉक्सिंगमध्ये गुंतली, नंतर 2016 मध्ये शूटिंगमध्ये हात आजमावण्यापूर्वी ज्युडो आणि कराटेकडे वळली. हरियाणा ओपनमध्ये तिने सुवर्णपदक जिंकल्यामुळे तिची प्रतिभा सुरुवातीपासूनच दिसून आली. अवघ्या 16 व्या वर्षी, मनूने 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भविष्यातील स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय देखील आहे. 2018 मध्ये, तिने युवा ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत अभिषेक वर्मासोबत मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
Please visit our website: Courseinmarathi.com
मनु भाकर कोण आहेत
मनु भाकर चे वडील राम किशन यांचं तिला बॉक्सर बनवण्याचं स्वप्न होतं. मनुचा मोठा भाऊ अखिल भाकरही बॉक्सिंग करत होता. भावाचं पाहत तिनेही बॉक्सर होण्याचं ठरवलं आणि तयारी सुरू केली. बॉक्सिंगमध्येही तिने चांगली कामगिरी केली मनु भाकर नॅशनल लेव्हलपर्यंत खेळली आणि मेडलही जिंकले. मात्र सरावावेळी मनुच्या डोळ्याला जखम झाली आणि तिला बॉक्सिंग आपली सोडावी लागली.
मनुने त्यानंतर मार्शल आर्टसची ट्रेनिंग शिकण्यास चालू केल. मात्र तिने काही दिवसातच हा खेळ सोडण्यचं ठरवलं पण या खेळामध्ये चीटिंग होते असं तिचं म्हणणं होतं. मुनने स्केटिंग, टेनिस आर्चरीमध्ये तिने भाग घेतला मात्र तिचं मन लागत नव्हतं.
मनु तिच्या आईच्या शाळेत शुटींग रेजमध्ये एक शॉट मारला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले पीटी टीचर अनिल जाखड यांनी तिच्यातील क्षमता ओळखली होती. मनुच्या पालकांना त्यांनी सांगिकतलं की तुम्ही मुलीला स्पोर्टसाठी वेळ द्या, ही देशासाठी नक्की पदक आणेल. अनिल जखड यांचं हे वाक्य खरं ठरलं आणि मनुनेही भारतात आज इहिास रचलाय.
ध्वजवाहक विश्वचषक आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकळ आहे. 16 वर्षीय मनू ही भारताची पहिली नेमबाज आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली.
2018 मध्ये, राष्ट्रीय पिस्तुल प्रशिक्षक जसपाल राणा हे भाकरचे मार्गदर्शक होते आणि म्हणाले की “मनू मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे” आणि आम्हाला 2020 ऑलिम्पिकसाठी तिच्यासारखे प्रतिभावान नेमबाज तयार करण्याची गरज आहे.
2019 मधील चारही पिस्तूल आणि रायफल ISSF विश्वचषकांमध्ये, तिने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरीसोबत सुवर्णपदक जिंकले, ज्यामुळे ही जोडी 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी प्रबळ दावेदार बनली.
फेब्रुवारी 2019 मध्ये तिने दिल्ली येथे 2019 ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
मे 2019 मध्ये तिने 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी म्युनिक ISSF विश्वचषक स्पर्धेत चौथे स्थान मिळवून पात्रता मिळवली
2021-2024
2022 आशियाई खेळांमध्ये, भाकरने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत ईशा सिंग आणि रिदम संगवान यांच्यासह भारतासाठी सांघिक सुवर्णपदक जिंकले.
पॅरिसमधील 2024 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भाकरने दोन कांस्यपदके जिंकली आहेत. पहिल, तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज बनली आहे. पुढे, तिने मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत आणखी एक कांस्य पदक जिंकले , ज्यामध्ये तिने सहकारी संघ सहकारी, सरबजोत सिंग सोबत भागीदारी केली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.
Please visit our website : RujitFacts.com
Conclusion
आशा प्रकारे Indian shooter Manu Bhaker यांचा जीवण संघर्ष विषयी या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.
FAQ
मनु भाकर यांचे वडील कोण आहेत ?
राम किशन भाकर आहे हे मर्चंट नेव्हीमध्ये मुख्य अभियंता आहेत.
भारताला 2024 मध्ये ऑलिम्पिक पदक कोणी मिळवून दिले?
मनू भाकरने पॅरिस 2024 ऑलिंपिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.