Bharat Jadhav Biography In Marathi:  मराठी चित्रपटसृष्टीतिल दिलदार माणूस भारत जाधव 2025

भरत जाधव(Bharat Jadhav) हा भारतिय मराठी कलाकार चित्रपट, थिएटर आणि टीव्ही शोमधील अभिनेता आणि निर्माता आहे आहेत.

जाधव मुंबईतल्या चाळीमध्ये वाढलेले, त्यांचे वडील टॅक्सी ड्रायव्हर, पुढे ते एकांकिका करु लागले. एकामागोमाग एक हिट नाटक, हिट सिनेमे देत ते मराठीतिल सुपरस्टार झाले. मराठीतला सर्वाधिक मानधन घेणारे पहिले अभिनेते बनले, आपण ज्या परिस्थितीतून आलो, त्याची जाण ठेवणाऱ्या भरत जाधव विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

व्हॅनिटी व्हॅन घेणारे ते मराठी चित्रपटसृष्टीतील पहिले असे अभिनेते आहेत. त्याचे ‘सही रे सही’ हे नाटक ब्लॉकबस्टर ठरले आहे, या ब्लॉकबस्टर नाटकाने 4444 शो पूर्ण केले आहेत. या नाटकाने मोठा आकडा गाठला आहे. त्यांनी हिंदी, मराठी चित्रपट आणि थिएटरमध्ये ते एक विनोदी भूमिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.

जाधव मूळचे कोल्हापूरचे, त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी मुंबईत मध्ये राहतात. भरतच यांचे बालपण लालबाग मधील परळ येथील राजाराम स्टुडिओच्या अंगणात गेले आहे. 

अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्या सोबत 3000 शो पूर्ण करणाऱ्या “ऑल द बेस्ट” या मराठी नाटकात अभिनय करताना भरत जाधव प्रसिद्ध झाला. पुढे त्यांनी ‘ साही रे सही ‘ या गाजलेल्या मराठी नाटकात काम केले. जत्रा चित्रपटातील ” कोंबडी पळाली ” या गाण्यातील त्याच्या अभिनयाचे रसिकांनी मन जजीनकले.

जाधव यांनी 2013 मध्ये स्वतची “भरत जाधव एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड” लाँच केली. लाँचिंग सोहळ्यात  राज ठाकरे, निखिल वागळे, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे हे दिग्धज कलाकार हजार होते.

Bharat Jadhav
Bharat Jadhav

Bharat Jadhav Biography

Full NameBharat jadhav
Born12 December 1973 ( age 52 years)
Born In PlaceKolhapur Maharashtra
Father’s nameGanapat Jadhav
Mother’s nameShanta Jadhav
WifeSarita Jadhav
ChildrensAarambh Jadhav & Surabhi Jadhav
EducationM D Collage of Arts, Science and Commerce, Mumbai
Social workActor, Producer, Theatre Artist
blockbuster Natak“Sahi re Sahi”
Net Worth7 Million

Please visit our website : Courseinmarathi.com

भरत जाधव वायक्तिक जेवणविषयी

भरत जाधव(Bharat jadhav) यांचा जन्म जरी मुंबईत झाला असला तरी ते मुळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांचे वडील गणपत जाधव हे 1948 मध्ये कामासाठी मुंबईत आले. छोटीमोठी कामे करता करता जाधवांचे वडील ड्रायव्हिंग शिकले, पुढे ते भाड्याची टॅक्सी चालवू लागले. या टॅक्सीनेच आपल्याला घडवले.

जाधव अभिमानाने सांगतात, भरतचे बालपण लालबाग परळ येथील राजाराम स्टुडिओच्या चाळीत मध्ये गेले. त्या व्यक्तीला चाळीतील सर्वजण आदर करायचे. त्यावेळी भरत यांना त्या व्यक्तीबाबत जास्त  काही माहीत नव्हते. पण जेव्हा तो कलाकार म्हणून काम करु लागले, तेव्हा त्यांची महानता समजली. ती व्यक्ती म्हणजे व्ही शांताराम. सिनेमातील एवढा मोठा माणूस आपल्या चाळीचा मालक आणि आपल्या येथे ते येत होते, याचे त्याला आनंद वाटले.

भरत यांना दोन भाऊ आहेत. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. आई-वडिलांनी कधी आपल्या मुलांना त्याची जाणवू करून दिली नाही. जाधव यांची भावंडे थोडी मोठी झाल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांना स्वतःची नवीन टॅक्सी घेऊन दिली. तिघांनी मिळून वडिलांना साथी टॅक्सी घेऊन दिली होती.

 त्यांनी 85 हून अधिक चित्रपट, आणि 8500 हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा, आमची चर्चा, ऑल द बेस्ट, सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, अधांतर, सौजन्याची ऐशी तैशी, पुन्हा सही रे सही, तू तू मी मी या नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

ते “जत्रा” चित्रपट आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे “ह्यलागड रे त्यालागड” (2005), “ साडे माडे तीन” (2008) मदनच्या भूमिकेत, शिक्षणाच्या आलाचा घो (2010) मधुकर राणे, नो एंट्री पुढे धोका आहे (2012), किशनच्या भूमिकेत. 2006 मध्ये त्यांनी तेलुगू चित्रपटामध्ये खतनाकमध्ये बँकर म्हणून काम केले.

एका मुलाखती मध्ये भरतने सांगितले की, अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम केल्यानंतरही त्यांना थिएटर सर्वात जास्त आवडते.

एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की थिएटर केल्यामुले त्यांना डाउन-टू-अर्थ राहायला शिकवले. मुलाखतीत त्याने खुलासा केला की त्याच्या यशानंतरही तो अजूनही त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला चहा देत असत.

  • 2013 मध्ये, भरत यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस, “भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे” उद्घाटन केले,
  • एका मुलाखतीत भरतने सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आणि त्यांची पत्नी सरिता यांनी कोल्हापुरात असणाऱ्या त्यांच्या जमिनीवर २००-२५० आंब्याची कलमे आणि १००-१२५ नारळाची झाडे लागवड केली.
  • चित्रपट निर्माते केदार शिंदे यांचे ते चांगले एक मित्र आहेत.
  • जाधव हे अनेक वर्षे मुंबईत राहिल्यानंतर २०२३ मध्ये भरत आपल्या कुटुंबासह मुंबईहून आपल्या मूळ गावी कोल्हापुरात स्थलांतरित झाले.
  • 2023 मध्ये, ते Scam 2003 – The Telgi Story या वेब सीरिजमध्ये सुनील रावत म्हणून काम करताना दिसले.

ऑल द बेस्ट’ नाटक आणि लग्न या बद्दल..

भरतकडे स्वतःची व्हॅनिटी व्हॅन असली तरी, त्यांचे शोज हाऊसफुल्ल होत असले तरीही ते एकदम साधा सरल माणूस आहे. कामगार वस्तीतून ते मोठे झाले. त्याच्या पत्नीचे नाव सरिता असून त्याला सुरभी आणि आरंभ अशी दोन मुले आहेत. त्याचे अँरेंज मॅरेज झाले आहे.

भरत जाधव(Bharat Jadhav) यांचे “ऑल द बेस्ट” हे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले होते. हे नाटक उत्तम चालत होते. पण अजून तो जास्त प्रसिद्धही नव्हते आणि त्याच्याकडे इतका पैसाही नव्हता. त्यावेळी भरत यांच्या आई-वडिलांनी भरतसाठी एक मुलगी पाहिली. भरत आणि सरिता हे पहिल्यांदा त्यांची बाहेर भेट झाली. सरिता या बीएमसीमध्ये आरोग्य खात्यात त्यावेळी त्या काम करत होत्या. भरत यांनी त्यावेळी पहिल्या भेटीत सांगितले की, मी नाटकात काम करतो. हे नाटक चालले, पण दुसरे चालेल की नाही हे सुद्धा माहीत नाही आणि मी नोकरीही करु शकेल की नाही, सांगता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी सरिता यांनी तुम्ही काही काळजी करु नका, तुम्हाला नोकरी करण्याची गरज नाही, घरचे मी पाहते, असा विश्वास भरत जाधवांना दिला.

आपण काही नसताना सुद्धा सरिता यांनी आपल्यावर विश्वास दाखवला, असे भरत सांगतात. मला आई-वडिलांना पाहणारी मुलगी हवी होती असे जाधव म्हणतात आणि सरिताने ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्याचे ते सांगतात.

Please visit our website : RujitFacts.com

भरतचे जाधव(Bharat jadhav) यांचे चित्रपट

  • स्टेपनी
  • शासन
  • वास्तव (हिंदी)
  • हसा चकट फू
  • खतरनाक
  • हाऊसफुल्ल
  • अगं बाई अरेच्चा
  • खबरदार
  • प्राण जाये पर शान न जाये (हिंदी)
  • जत्रा
  • पछाडलेला
  • नाना मामा
  • दोन फुल एक डाऊटफुल
  • चालू नवरा भोळी बायको
  • सरीवर सरी
  • नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे
  • नवऱ्याची कमाल बायकोची धमाल
  • माझा नवरा तुझी बायको
  • इश्शं
  • ह्यांचा काही नेम नाही
  • बकुळा नामदेव घोटाळे
  • मुक्काम पोस्ट लंडन
  • मुंबईचा डबेवाला
  • गलगले निघाले
  • साडे माडे तीन
  • लग्नाची वरात लंडनच्या घरात
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
  • गोंद्या मारतंय तंगडं
  • रिंगा रिंगा
  • होऊन जाऊ दे
  • शिक्षणाचा आयचा घो
  • जावईबापू जिंदाबाद
  • क्षणभर विश्रांती
  • आटापिटा
  • टाटा बिर्ला आणि लैला
  • हॅलो, गंधे सर
  • झक मारली बायको केली
  • मस्त चाललंय आमचं
  • झिंग चिक झिंग
  • फक्त लढ म्हणा
  • डावपेच
  • कळशेकर आहेत का
  • नो एन्ट्री पुढे धोका आहे
  • आम्ही चमकते तारे
  • धावाधाव
  • श्रीमंत दामोदर पंत
  • माझ्या नवऱ्याची बायको
  • येड्यांची जत्रा
  • सत ना गत
  • खो खो
  • भूताचा हनिमून
  • बीडचा राजा
  • चिंतामणी
  • पुणे व्हाया बिहार
  • शासन
  • अगं बाई अरेच्चा 2
  • एक कुटुंब तीन मिनार
  • उंच भरारी
  • अप्पा आणि बाप्पा

Conclusion

आशा प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीतिल दिलदार माणूस भारत जाधव(Bharat jadhav) यांचा जीवनाचा प्रवास कसा झाला हे आपण या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.

FAQ

भारत जाधव यांचे पूर्ण नाव काय आहे ?

भारत गणपत जाधव

भारत जाधव यांचे वय ?

52

भरत जाधव यांचा जन्म कधी झाला?

12 December 1973 ( age 52 years)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top