अक्षय कुमार – एक परिचय
अक्षय कुमार( Akshay Kumar ) हा बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता असून त्याला “खिलाडी कुमार” म्हणूनही संबोधले जाते. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याचं नाव बॉलिवूडमधील सर्वाधिक काम करणाऱ्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये ओळखलेल जातं.
(Akshay Kumar) जन्म व लहानपणीचे दिवस
पूर्ण नाव: राजीव हरिओम भाटिया
जन्मतारीख: 9 सप्टेंबर 1967
जन्मस्थान: अंबाला, पंजाब, भारत
वडिलांचे नाव: हरिओम भाटिया (लष्करात काम केले)
आईचे नाव: अरुणा भाटिया (गृहिणी, नंतर चित्रपट निर्माती)
शालेय शिक्षण: डॉन बॉस्को स्कूल, मुंबई
महाविद्यालय: गुरुनानक खालसा कॉलेज, मुंबई
विशेष: लहानपणी तो खूप शांत आणि खेळाडूवृत्तीचा मुलगा होता. त्याला मार्शल आर्ट्समध्ये खूप रस होता.
करिअरची सुरुवात
अक्षय कुमार यांनी बँकॉकमध्ये जाऊन मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले.
भारतात परत आल्यावर काही काळासाठी फोटोग्राफरचे असिस्टंट, नंतर मॉडेलिंग केली.
फिल्म डेब्यू: 1991 मध्ये ‘सौगंध’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
पहिला यशस्वी चित्रपट: ‘खिलाडी’ (1992) – यानंतर तो ‘खिलाडी’ मालिकेसाठी प्रसिद्ध झाला.
अक्षय कुमार यांच्या करिअरची झलक
अॅक्शन चित्रपटांपासून कॉमेडीपर्यंत विविध भूमिकांमध्ये नाव कमावलं.
प्रसिद्ध चित्रपट:
हेरा फेरी
मुजसे शादी करोगी
स्पेशल 26
रुस्तम
टॉयलेट: एक प्रेम कथा
केसरी
सूर्यवंशी
त्यांनी आजपर्यंत 150+ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Please visit our website : Courseinmarathi.com
कौटुंबिक माहिती- (Akshay Kumar)
पत्नीचे नाव: ट्विंकल खन्ना (राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची कन्या, अभिनेत्री आणि लेखिका)
लग्न: 2001 साली विवाह केला.
आरव कुमार (पुत्र)
नितारा कुमार (कन्या)
अक्षय कुमार यांचे वार्षिक उत्पन्न (2024 अंदाजे)
वार्षिक उत्पन्न: अंदाजे ₹400-500 कोटी (विविध स्त्रोतांनुसार)
उत्पन्नाचे स्त्रोत:
चित्रपट
जाहिराती
ब्रँड एन्डोर्समेंट
स्वतःची प्रोडक्शन कंपनी
विविध स्टार्टअप्स व गुंतवणूक
Akshay Kumar – सन्मान व पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार (2009)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – ‘रुस्तम’साठी
अनेक Filmfare Awards
अक्षय कुमारचे (Akshay Kumar ) प्रसिद्ध चित्रपट
अक्षय कुमारने विविध शैलींमध्ये काम केलं आहे. काही लोकप्रिय आणि महत्त्वाचे चित्रपट खाली दिले आहेत:
अॅक्शन आणि थ्रिलर
मैं खिलाडी तू अनाडी (1994)
मोहरा (1994)
सबसे बडा खिलाडी (1995)
रुस्तम (2016)
बेबी (2015)
हॉलीडे (2014)
सूर्यवंशी (2021)
कॉमेडी
हेरा फेरी (2000)
फिर हेरा फेरी (2006)
गरम मसाला (2005)
भूल भुलैया (2007)
सिंह इज किंग (2008)
हाउसफुल सिरीज (2010, 2012, 2016, 2019)
सामाजिक व प्रेरणादायी
टॉयलेट: एक प्रेम कथा (2017)
पैडमॅन (2018)
गोल्ड (2018)
केसरी (2019)
मिशन मंगल (2019)
Please visit our website : Courseinmarathi.com
अक्षय कुमारचे प्रेरणादायी विचार (Quotes)
“सकाळी ४ वाजता उठणे , कारण त्याच्या यशाचं पहिलं पाऊल म्हणजे वेळेचं व्यवस्थापन.”
“स्वतःवर विश्वास ठेवा आणि कष्ट घ्या, तुम्हाला यश नक्की मिळेल.”
“सिंहासनावर बसण्यासाठी राजघराण्यात जन्म घ्यावा लागत नाही, फक्त पात्रता असावी लागते.”
“शरीर हेच खरं मंदिर आहे, ते नीट सांभाळा.”
अक्षय कुमारचा(Akshay Kumar ) फिटनेस मंत्र
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. ते वयाच्या 50 नंतरही तितकाच एनर्जेटिक आणि अॅक्टिव्ह आहेत.
(Akshay Kumar) त्याचा दिनक्रम:
सकाळी ४ वाजता उठणे
योगा आणि मार्शल आर्ट्सचे सराव करणे.
जंक फूडपासून दूर राहणे.
संध्याकाळी ६ नंतर जेवण बंद
नैसर्गिक आहारावर भर – घरचं जेवण, फळं, ड्रायफ्रूट्स
टिप्स:
जिमपेक्षा नैसर्गिक व्यायामावर भर
झोपेचं वेळापत्रक काटेकोर पाळणं
वय जसं वाढतं, तसं फिटनेसची जबाबदारीही वाढते
अक्षय कुमारचे स्टंट प्रशिक्षण (Stunt Training)
मार्शल आर्ट्सचा प्रारंभ:
अक्षय कुमारने मार्शल आर्ट्सचा सराव 9 व्या वर्षी सुरू केला.
नंतर ते बँकॉक (थायलंड) येथे गेला आणि Muay Thai (थायलंडचा प्रसिद्ध युद्धकला प्रकार) शिकला.
त्यानी बँकॉकमध्ये शेफ आणि वेटर म्हणून काम करत आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
विशेष कौशल्य:
Taekwondo: त्यांना भारत सरकारने ब्लॅक बेल्ट दिला आहे.
Karate, Judo, Kickboxing, Parkour सारख्या विविध स्टंट कौशल्यांमध्ये पअग्रेसर आहेत.
ते स्वतःचे 90% पेक्षा अधिक स्टंट्स स्वतः करतात. त्यामुळे त्यांना “India’s Jackie Chan” असंही म्हटलं जातं.
स्टंटसाठी प्रसिद्ध चित्रपट:
- खिलाडी सिरीज
- कमांडो
- हॉलीडे
- बेबी
- वारियर्स
- सिंह इज किंग, इत्यादि आहेत.
वैयक्तिक प्रशिक्षण संस्था:
अक्षय कुमारने ‘Free Martial Arts Training for Women’ या नावाने उपक्रम चालवला आहे, ज्यात महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मोफत दिले जाते.
कौटुंबिक जीवन (Family Life)
पत्नी: ट्विंकल खन्ना
जन्म: 29 डिसेंबर 1974
आई-वडील:
राजेश खन्ना (बॉलिवूड सुपरस्टार)
डिंपल कपाडिया (अभिनेत्री)
व्यवसाय: लेखिका, इंटिरियर डिझायनर, स्तंभलेखिका आणि निर्माता आहेत.
लेखन कार्य:
‘Mrs Funnybones’, ‘The Legend of Lakshmi Prasad’, ‘Pyjamas Are Forgiving’ ही तिची पुस्तके बेस्टसेलर्स आहेत.
व्यक्तिमत्त्व: अत्यंत हुशार, स्पष्टवक्ती आणि विनोदी स्वभावाची.
पुत्र: आरव कुमार
जन्म: 2002
शिक्षण: UK मध्ये उच्च शिक्षण घेत आहे.
स्वभाव: मिडिया पासून दूर राहणं पसंत करतो.
मार्शल आर्ट्समध्ये रुची: वडिलांप्रमाणेच त्यालाही मार्शल आर्ट्समध्ये रस आहे.
कन्या: नितारा कुमार
जन्म: 2012
अक्षय आणि ट्विंकल दोघंही तिला सामान्य जीवन देण्याचा प्रयत्न करतात.
अक्षय तिला ‘माझं हृदय’ असं बोलतात.
FAQ
क्षय कुमारचे खरे नाव काय आहे?
अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरिओम भाटिया आहे.
अक्षय कुमारचा जन्म कधी आणि कुठे झाला?
त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला.
अक्षय कुमारने अभिनय क्षेत्रात पदार्पण केव्हा केलं?
१९९१ मध्ये ‘सौगंध’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
अक्षय कुमार कोणत्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतो?
तो सैन्य आणि शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी काम करतो. तसेच, तो स्वच्छता, आरोग्य आणि स्त्री सक्षमीकरण यांसारख्या विषयांवर चित्रपटही करतो.