सूर्यकुमार यादव यांचा जीवन प्रवास | Suryakumar Yadav Biography In Marathi

Suryakumar Yadav Biography In Marathi :  सूर्यकुमार यादव यांचा जन्म 14 September 1990 मुंबई इथे झाला. तो मुंबई इंडियन्स या संघासाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2018 पासून खेळतो. त्यांची जर्सी नंबर 63 आहे.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव यांचा जन्म 14 September 1990 मुंबई इथे झाला. तो मुंबई इंडियन्स या संघासाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2018 पासून खेळतो. त्यांची जर्सी नंबर 63 आहे. त्यांचे वडील अशोक कुमार यादव हे भाभा अनुसंशोधान केंद्रात (BARC) मध्य इंजीनियर होते, आणि त्यांची आई स्वप्ना यादव या गृहिणी आहेत. सूर्यकुमार का कुटूंब उत्तर प्रदेश मधल्या गाजीपुर जिल्ह्यातील आहे. त्यांनी आपले शिक्षण अणुऊर्जा केंद्रीय विद्यालय, मुंबई नंतर त्यांनी पिल्लई कॉलेग ऑफ आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस, मुंबई इथे शिक्षण पूर्ण केल.

Suryakumar Yadav

Full NameSuryakumar Ashok Yadav
Born14 September 1990 (34 years)
Roll Batting
Father NameAshok Kumar Yadav
Mother NameSwapna Yadav
Sister NameDinal Yadav
Wife NameDivisha Shetty
AwardICC टी 20 इंटरनॅशनल प्लेयर ऑफ द एअर
Net worth55 Crore

Please visit our website: Courseinmarathi.com

क्रिकेटर मधली आवड

सूर्यकुमार यादव यांना लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. त्याने आपल्या वाराणसी मधल्या विनोद कुमार यादव काकांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि लवकरच त्याची प्रतिभा उदयास आली. त्याच्या वडिलांनी त्याची क्रिकेटमधील आवड ओळखून त्याला व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेट प्रशिक्षण

सूर्यकुमार यादव 10 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी चेंबुर मधल्या बीएआरसी मध्ये खेळण्या साथी नाव दिले. त्या नंतर ने जिमखाना क्रिकेटर क्लब मध्ये क्रिकेट प्रॅक्टिस चालू केली. क्रिकेटर सूर्यकुमार ने मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट अकॅडेमी मध्ये आपले प्रशिक्षण घेतले. त्याने अंडर-14, अंडर-16, अंडर-19, स्तरावर मुंबई चे प्रतिनिधि त्व केले. त्यांची आक्रमक फलंदाजी आणि तांत्रिक कौशल्यामुळे सूर्यकुमार पटकन एक प्रमुख खेळाडू बनला.

1) देशांतर्गत खेळामधील कामगिरी

सूर्यकुमार यादव ने 2010 मध्ये क्रिकेट ची मुंबईच्या रणजी संघातून पदार्पण केले होते. सूर्यकुमारला 2010 च्या शेवटी अखेर दिल्लीविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. सूर्यकुमार ने2014-15 च्या रणजी सीजन च्या पहिल्या मुंबई टीम कहा कॅप्टन बनवले. त्याने पहिल्या समण्यातच 73 धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आशा अनेक महत्व पूर्ण खेळी खेळल्या आणि मुंबईला सूर्यकुमार यादव ने अनेक विजय मिळवून दिले.

2) आईपीएल करियर कामगिरी

सूर्यकुमार यादव ने 2012 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) मधून आयपीएल ची सुरुवात केली. 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मध्ये सामील झाल्यानंतर त्याने 2015 मध्ये KKR साठी खेळून आपली नवीन छाप पाडली. 2018 मध्ये, तो पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला, मुंबई इंडियन्स साथी टूर्नामेंट मध्ये सगळ्यात जास्त धावा बनवणारा खेळाडू बनला,एकूण रन 512 बनवल्या आणि त्याची आक्रमक फलंदाजी आणि महत्त्वपूर्ण खेळीमुळे तो एक प्रमुख खेळाडू बनला.

3) आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी

सूर्यकुमार यादवने 14 मार्च 2021 रोजी इंग्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करताना 57 धावा केल्या होत्या. यानंतर, त्याने 18 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार ने टी20 अंतर्राष्ट्रीय मध्ये त्यांनी पहिल्या बॉल मध्ये सिक्स मारला, आणि असा करणारा तो पहिलं भारतीय आहे.

सूर्यकुमार यादव चे रेकॉर्डस

सूर्यकुमार यादव हा जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याचा T20I मध्ये 180 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट आहे.

6 नोव्हेंबर 2022 रोजी एका कॅलेंडर वर्षात 1000 T20I धावा करणारा सूर्यकुमार यादव पहिला भारतीय ठरला. 

30 ऑक्टोबर 2022 रोजी, सूर्यकुमार यादवला फलंदाजांच्या ICC T20I क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळाला.

नोव्हेंबर 2022 मध्ये, तो एका कॅलेंडर वर्षात T20I मध्ये दोन शतके करणारा दुसरा भारतीय बनला आणि त्याने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली.

T20I मध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा केवळ 5वा भारतीय खेळाडू आहे आणि चौथ्या किंवा त्यापेक्षा कमी फलंदाजी करताना हा आकडा गाठणारा फक्त दुसरा खेळाडू आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये, तो T20I मध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज बनला.

Suryakumar Yadav Biography In Marathi

वैयक्तिक जीवन

सूर्यकुमार यादवने 7 जुलै 2016 रोजी प्रोफेशनल डान्स कोच असलेल्या देविशा शेट्टीशी लग्न केले. दोघे 2012 मध्ये एका कॉलेज इव्हेंटमध्ये भेटले होते आणि तेव्हापासून ते एकत्र आहेत. सूर्यकुमार आणि देविशाची जोडी क्रिकेट आणि सोशल मीडिया वर खूप पसंत केली जाते.

यादव कुटुंब

सूर्यकुमार यादव यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील अशोक कुमार यादव हे भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) अभियंता होते आणि त्यांची आई स्वप्ना यादव गृहिणी आहेत.

संपत्ती

सूर्यकुमार यादव यांची एकूण संपत्ती सुमारे 55 दशलक्ष (Crore) आहे (2024 पर्यंत), क्रिकेट, जाहिराती आणि बँड अॅम्बेसेडरशिप हे त्याचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. सूर्यकुमारकडे अनेक ब्रँड कॉनटॅक्ट आहेत, ज्यात Puma, Navia, आणि इतर प्रमुख ब्रेडचा समावेश आहे.

Car ModelPrice
Mercedes-Benz GLE CoupeRs 2.15 Crore
Range Rover VelarRs 90 lack
Audi A6Rs 60 lack
nissan zongaRs 15 lack
Mercedes-Benz GLS 400dRs 1.29 Crore
BMW 5 Series 530d M SportRs 74.49 lack
Hyundai i20Rs 11.88 lack
FortunerRs 50.74 lack
Mini Cooper SRs 41.20 lack
Suryakumar Yadav car

Suryakumar Yadav Brand Endorsement

  • Dream 11
  • Boult Audio
  • Freiheit
  • Sareen Sports
  • 100 MB – Master Blaster
  • Nutrezy
  • Noise
  • Zebronics
  • सिक्का DCX
  • Daniel Wellington
  • Sofit India Soya Milk
  • Uncle Tony India

हे ही वाचा : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांची मराठी मध्ये माहिती.

खेळशी संबंधी वैशिष्ट्ये

सूर्यकुमार यादव आक्रमक फलंदाजी, उत्कृष्ट फूटवर्क आणि तांत्रिक कौशल्यासाठी ओळखला जातो. कोणत्याही परिस्थितीत खेळ आपल्या बाजूने वळवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आक्रमकता आणि संयम यांचा अनोखा मिलाफ त्याच्या खेळण्याच्या शैलीत पाहायला मिळतो.

तो मैदानाभोवती, ऑफ आणि लेग दोन्ही बाजूंनी खेळतो आणि त्याच्या शॉट्सच्या श्रेणीसाठी त्याला “मिस्टर 360” म्हटले जाते. 

आंतरराष्ट्रीय पदार्पण: यादवने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, जिथे त्याने षटकार मारून पहिला चेंडू मारला. 

T20 विश्वचषक: यादव पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या 2021 आणि 2022 आवृत्त्यांमध्ये खेळला, जिथे त्याने 360-बॅटिंगचे प्रदर्शन केले. 

ICC T20I प्लेयर ऑफ द इयर: यादवला 2022 आणि 2023 मध्ये ICC T20I प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले. 

सध्याचा भारतीय T20 कर्णधार: यादव हा भारतीय T20 संघाचा सध्याचा कर्णधार आहे. 

सन्मान आणि पुरस्कार

* आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजः सूर्यकुमारला त्याच्या आयपीएलमधील उत्कृष्ट फलंदाजीसाठी अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे.

* देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीः रणजी ट्रॉफी आणि इतर देशांतर्गत स्पर्धामध्ये केलेल्या कामगिरीसाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सामाजिक योगदान

सूर्यकुमार यादव हे समाजसेवेतही त्यांचा मोठा योगदान आहेत. त्यांनी अनेक धर्मादाय कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे आणि गरजूंना मदत करण्यासाठी पैसे गोळा केले आहेत. आपल्या यशोगाथांद्वारे तो तरुणांना प्रेरणा देतो आणि प्रोत्साहन देतो.

सूर्यकुमार यादव यांची कथा संघर्ष, संयम आणि कठोर परिश्रमाचे उदाहरण आहे. त्याच्या जीवनातील संघर्षाने त्याला मजबूत आणि आत्मविश्वास दिला आहे. सूर्यकुमारने केवळ भारतीय क्रिकेटमध्येच आपला ठसा उमटवला नाही तर तो तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. त्याचा प्रवास अजूनही सुरू आहे आणि भविष्यात तो आणखी मोठे विक्रम रचून भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेईल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे. लक्ष मजबूत असतील तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते हे सूर्यकुमार यादव यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने सिद्ध केले आहे.

Conclusion

आशा प्रकारे सूर्यकुमार यादव यांचा जीवण संघर्ष विषयी या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.

FAQ

सूर्यकुमार यादव यांचा जन्म केव्हा झाला ?

14 September 1990

सूर्यकुमार यादव चा जर्सी नंबर ?

63

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top